كلمات الأغاني
आ आ आ आ आ आ
पाय लागता गावाला
वाट बिलगुदवल्या
पाय लागता गावाला
वाट बिलगुदवल्या
मला घेऊन उराशी
कवटाळून राहिल्या
कुठे होता बाळा माझ्या
बाळा मला विचारू लागल्या
जुन्या भिंतीला टेकत
आठवणी जाग्या झाल्या
जशी ओळख पातळी हळू एक एक
तसे बरसू लागले माझ्या डोळ्यातले मेघ
काळ लोटला सांग कसा गेला पोरा
घडीभर सावलीला विसावा घे थोडा
कधी पोटभर नाही तुला घास रे मिळाला
आज पुन्हा तिचा घास माय भरविल तुला
पाय लागता गावाला
वाट बिलगुदवल्या
मला घेऊन उराशी
कवटाळून राहिल्या
किलबिल पाखराची बसलेला फांदीवर
किलबिल शाळेतली नसलेला बाकावर
पेरू तुरट तुरट
मला चिंचेची चट
पडलेली बोरं लाव मीठ न तिखट
खेळताना विटी दांडू
खो खो लंगडी न गोट्या
किती पडलो भांडलो
मारामाऱ्या केल्या मोठ्या
पुन्हा जमाती पडता कानी शैलीतली हाक
मागं विसरून सार पडी पाठीवर थाप
पाय लागता गावाला
वाट बिल गुदवल्या
मला घेऊन उराशी
कवटाळून राहिल्या
जशी खेड्यातली शाळा चार भीतीत मावली
हो पण तीनच दिली मला विद्देची सावली
दिल गुरुजींन दान दिली खडू पाठी
नाही मागितला पैका उभं केला जगासाठी
शाळा सुटता सुटता ऊन डोईवर येई
आपोआप नदीकडे माझी वाट मला नेई
उड्या मारता मारता आम्ही पोहतच राही
कधी जाई खोलवर कधी शर्यत पाही
दिस मावळात आहे पोर भुकेली थकेली
दारावर आजी उभी तिची छडी वाकलेली
आई शेतात राबता
घास भरविल ताई
हाती दप्तर देता
अक्का किती पापे घेई
कधी सुखला न घाम
माझ्या दादा च्या देहात
कधी सुखला न घाम
माझ्या दादा च्या देहात
कधी थांबला ना पाय
कधी थांबला ना हात
भाकरीच्या तुकड्याला
रोज मिरचीचा ठेचा
चव इथल्या पाण्याची
कशी विसरीन लेका
भाकरीच्या तुकड्याला
रोज मिरचीचा ठेचा
चव इथल्या पाण्याची
कशी विसरीन लेका
पाय लागता गावाला
वाट बिल गुदवल्या
कवटाळून उराशी
पार पार वेड्या झाल्या
कसा विसराहिला
Raleigh Music Publishing LLC