Lyrics
आमुचे नाव आसू आसू आसू आमुचे नाव आसू आसू ग आसू ग
आमुचे नाव आसू आसू ग आसू ग
गहिऱ्या गालांवरल्या गुलाबांच्या कलिकांनो
ऐका ग बाई ऐका ग आमुचे नाव आसू ग आमुचे नाव आसू
कन्या सासऱ्याशी जाते ग बाई मागे परतुनी पहात ही आई
पापणीच्या पालखीतुनी मिरवित मिरवित नेते ग मिरवित मिरवित नेते ग
नयनांच्या निरांजनी आम्ही जळतो वाती ग
आमुचे नाव आसू ग आमुचे नाव आसू
बुबुळांच्या बागेमधली ही फुलपांखरे निळी
श्रीकृष्णाच्या मुरलीवरली सात टिंबे आम्ही दिली
श्रीकृष्णाच्या मुरलीवरली सात टिंबे आम्ही दिली
गवळणींच्या गळ्यांतले आम्ही हार झालो ग
आमुचे नाव आसू ग आमुचे नाव आसू
बिंदुएवठ्या आम्हांमध्ये
तरते जगही बुडते ग बुडते जगही तरते ग
तरते जगही बुडते ग बुडते जगही तरते ग
आमुचे नाव आसू आसू आसू
Manmohan
Royalty Network