Slová
आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे
आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे
साद देते मी तुला अन् तू मला पडसाद दे
आस आहे अंतरी या
जुळविता तार विणेच्या
जुळविता तार विणेच्या जुळविली आम्ही मने
प्रेमगीतांना प्रिया तू
प्रेमगीतांना प्रिया तू आगळे संगीत दे
आस आहे अंतरी या
चांदवेडे हृदय माझे ओढ घेई तुजकडे
चांदवेडे हृदय माझे ओढ घेई तुजकडे
विरहि जो अंगार आहे गारवा तू त्यास दे
आस आहे अंतरी या
प्रीतिचे दोघे प्रवासी मार्गी येथे भेटलो
यौवनाच्या मंदिरी या
यौवनाच्या मंदिरी या चांदण्याचा स्पर्श दे
आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे
आसरा हृदयात दे
Dashrath Pujari, Madhukar Joshi
Royalty Network